वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गुंड छोटा राजन टोळीचा सदस्य पॉल्सन जोसेफ याला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. या पूर्वी या प्रकरणातील आरोपी तसेच महिला पत्रकार जिग्ना वोरा हिला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने पॉल्सनला जामीन मंजूर केला आहे. सोमवापर्यंत पॉल्सनची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. डे यांच्या हत्येच्या कटात आपला सहभाग असल्याचे सांगणारा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे जामीन देण्याची विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती.
परंतु पॉल्सनविरुद्ध ठोस पुरावे असल्याचा दावा करीत पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. पॉल्सन याने महादंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या कबुलीजबाबात डे यांच्या हत्येतील सहभाग आणि भूमिकेबाबत कबुली दिली आहे. शिवाय सहआरोपींनीही त्याचा सहभाग असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा