नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्या शीतल साठे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी जामीन मंजूर केला. शीतल साठे या सध्या गर्भवती असून, पुढील महिन्यात त्यांची प्रसुती नियोजित आहे.
जूनच्या सुरुवातीला सत्र न्यायालयाने साठे यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनाला सरकारी पक्षाने विरोध न केल्याने ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
गेल्या दोन एप्रिलला शीतल साठे यांनी मुंबईत पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्या भूमिगत होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
शीतल साठे यांना जामीन मंजूर
नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्या शीतल साठे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी जामीन मंजूर केला.

First published on: 27-06-2013 at 07:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hc grants bail to naxal sympathiser sheetal sathe