अभिनेता गोविंदा याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिलासा दिला. काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला मुस्काटात लगावल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध करण्यात आलेली याचिका सोमवारी न्यायालयाने फेटाळली. गोविंदा याने आपल्याला मुस्काटात लगावल्याची तक्रार संतोष राय यांनी केली होती. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, गोविंदा यांच्याविरुद्ध आवश्यक पुरावे सादर न करण्यात आल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली. न्या. एम. एल. ताहालियानी यांनी हा निकाल दिला. १६ जानेवारी २००८ मध्ये गोविंदा यांनी त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणी आपल्या मुस्काटात लगावल्याचे राय यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा