हेडलीच्या जबाबाने हल्ल्यामागे पाकिस्तान असल्यावर शिक्कामोर्तब
मुंबईवरील हल्ला करणाऱ्या दहा दहशतवाद्यांनी त्यापूर्वीही दोनवेळा मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन्ही प्रयत्न फसले होते, असा जबाब लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक डेव्हीड कोलमन हेडली याने सोमवारी मुंबई येथील विशेष न्यायालयासमोर दिला. पाकिस्तानातील आयएसआयने लष्कर-ए-तोयबाच्या साथीने या हल्ल्याचा कट रचल्याचा दावा करून हेडलीने २६/११च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. हेडलीने या वेळेस हल्ला रचणाऱ्या आयएसआय आणि लष्करच्या अधिकाऱ्यांची नावेही न्यायालयासमोर उघड केली.
मुंबई हल्ल्याप्रकरणीच शिकागो कारागृहात ३५ वर्षांची शिक्षा भोगत असलेला हेडलीला मुंबईतील खटल्यात माफीचा साक्षीदार बनविण्यात आलेले आहे. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ‘व्हिडिओ कॉन्फरन्स्िंाग’द्वारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर त्याचा जबाब नोंदवण्यास सुरूवात केली. एखाद्या आरोपीची तीही दहशतवाद्याची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स्िंाग’द्वारे साक्ष नोंदविण्याची ही भारतीय न्यायव्यवस्थेतील ही पहिलीच घटना आहे. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ‘व्हिडिओ कॉन्फरन्स्िंाग’द्वारे अमेरिकेतील कारागृहातून हेडलीचा जबाब नोंदविण्यास सुरूवात झाली. त्या वेळेस त्याच्यासोबत त्याचे वकील जॉन, अमेरिकी न्यायालयाच्या अॅटर्नी जनरल सारा आणि शिकागो न्यायालयाचे कारकून बॉब असे तिघेजण उपस्थित होते. त्याचे कायदेशीर सल्लागार म्हणून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी हे मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणीच्या वेळेस उपस्थित होते.
सोमवारच्या सुनावणीत हेडलीने लष्कर आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे २६/११च्या हल्ल्याचा कट रचला हे सांगताना पाकिस्तानातील मुजफ्फराबाद येथे दहशतवाद्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आल्याची तपशीलवार माहिती न्यायालयाला दिली. त्या वेळेस त्याने २६/११च्या हल्ल्यापूर्वी दोनवेळा मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि दोन्ही प्रयत्न फसल्याचा खुलासा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा