मुंबई : शहापूर तालुक्यातील दुर्गम गावातील अंगणवाडीत लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करताना सचिन कंजारा या तीन वर्षाच्या मुलाच्या ह्रदयाच्या ठोक्यात गडबड असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. या मुलाला ठाण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणी व उपचारासाठी न्यावे लागेल असे त्याच्या अशिक्षित आदिवासी पालकांना डॉक्टरांनी समजून सांगायचा प्रयत्न केला. पण अंधश्रद्धा म्हणा किंवा भितीपोटी पालक तयार होत नव्हते. शेवटी डॉ संकेत कुलकर्णी यांनी स्थनिक आदिवासी संघटनेच्या लोकांशी संपर्क साधून सचिन तसेच आणखी चारपाच ह्रदयविकाराच्या रुग्णांना ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात आणले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून या मुलांवर ह्रदयशस्त्रक्रिया केल्या. आता या सर्व मुलांची प्रकृती उत्तम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्य तपासणी राबविण्यात येतो. राज्यातील सर्व अंगणवाडी तसेच शासकीय शाळा आणि आश्रम शळांमध्ये वर्षभरातून दोनवेळा ही आरोग्य तपासणी केली जाते. जवळपास अडीच हजार डॉक्टरांच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते.यासाठी संबंधित डॉक्टरांना ज्येष्ठ मेडिसीन डॉक्टर तसेच बालरोगतज्ज्ञाच्या माध्यमातून नियमित प्रशिक्षणही दिले जाते. मात्र दुर्गम आदिवासी भागात जर एखादा बालह्रदयरुग्ण आढळला तर त्याला मोठ्या शहरात उपचारासाठी नेण्याकरता पालकांना समजावणे हिच एक मोठी कसरत असल्याचे डॉ संकेत कुलकर्णी म्हणाले. शहापूर तालुक्यात ५८० अंगणवाडी तसेच ५०२ शाळा आणि २४ आश्रमशाळांमधील मुलांच्या आरोग्याची तपासणी डॉ सचिन जाधव, डॉ शोभा बनगर तसेच डॉ कुलकर्णी आदी करतात तर त्यांना लागणार्या मदतीचे नियोजन ठाणे जिल्हा रुग्णालयातील सुपरवाझर विनोद जोशी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार करतात. ठाणे जिल्ह्यातील बहुतेक बालकांच्या ह्रदयशस्रक्रिया या ज्युपीटर हॉस्पिटमध्ये पार पडतात.

आणखी वाचा-आणखी एक बेस्ट बसचा अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

यंदा वर्षभरात राज्यात तब्बल १,५८४ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर १९,६१७ बालकांवर इतर वेवगेळ्या आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे अतिरिक्त आरोग्य संचालक व या कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ बबीता कमलापूरकर यांनी सांगितले. राज्यात एकूण ७३ रुग्णालयांमध्ये या बालकांच्या ह्रदयशस्रक्रिया करण्यात येत असून यातील काही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गतची रुग्णालये आहेत तर काही पंतप्रधान आरोग्य व महात्मा फुले येजनेतील रुग्णालये आहेत. ही सर्व रुग्णालये प्रामुख्याने मुंबई,ठाणे, पुणे , नागपूर आदी मोठ्या शहरात असतात. आदिवासी गडचिरोली, नंदुरबार तसेच ठाणे जिल्ह्यासह दुर्गम भागातील ह्रदयविकाराच्या मुलांवर उपचार करण्यासाठी मोठ्या शहरात घेऊन जावे लागेल हे पालकांना समजावून सांगणे हे आमच्या डॉक्टरांपुढचे मोठे आव्हान असते, असे डॉ कमलापूरकर म्हणाल्या.या मुलांना व पालकांना तपासणीसाठी गावाहून आणणे तसेच उपचारादरम्यान पालकांच्या राहाण्याखाण्याची व्यवस्था कधी सीएसआर तसेच रुग्णालयांच्या माध्यमातून केली जाते.अनेकदा जिल्हा शल्यचिकित्सक या खर्चाचा भार उचतात.

या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे २ कोटी बालकांची वर्षभरात दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या कालावधीत ३,३३४ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया, तर ३२,८०१ बालकांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सन २०२२-२३ या कालावधीत ३,८३९ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया, तर ३०,२६९ इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-सायबर फसवणूक टाळण्याचे मार्ग, डोंबिवलीत आज ‘लोकसत्ता अर्थभान’

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणारे जन्मत: असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे तसेच बालकांची आरोग्याची तपासणी व त्यांच्यात आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचा लाभ राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास २ कोटी मुलांना दरवर्षी होत आहे. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावर ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून दोन वेळेस आरोग्य तपासणी करण्यात येते. या व्यतिरिक्त शासकीय व निमशासकीय शाळेतील ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनाही या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ होत आहे. या आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषयक समस्या, अडचणीसाठी योग्य त्या संदर्भ सेवा व सर्व प्रकारचे वैद्यकीय व शल्यचिकित्सक उपचार मोफत पुरविण्यात येतात.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम १ एप्रिल २०१३ पासून लागू करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त करण्यात आलेली आहेत. प्रत्येक पथकात १ वाहन, २ वैद्यकीय अधिकारी, १ औषधी निर्माण अधिकारी, १ एएनएम, तपासणी साहित्य, इत्यादी पुरविण्यात आलेले आहे. आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे गावनिहाय वेळापत्रक शिक्षण आणि महिला व बाल कल्याण विभागांच्या समन्वयाने तयार करुन प्रत्येक पथकास ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. जवळपास तीन हजार डॉक्टरांच्या माध्यमातून ही आरोग्य तपासणी होत असते. तपासणीदरम्यान आढळणार्या सर्व बालरुग्णांची पूर्ण काळजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील डॉक्टर तसेच जिल्हा रुग्णालयातील संबधित जिल्हा शल्यचिकित्सक व सुपरवायझर घेतात असेही डॉ कमलापूरकर म्हणाल्या.