आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या ‘माधवबाग’द्वारे विधानसभा व विधान परिषद सदस्यांसाठी १५ ते १७ डिसेंबर दरम्यान हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

सतत कार्यरत असणाऱ्या लोकप्रतिनिधींचे व्यग्र दिनक्रमामुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळेच लोकप्रतिनिधींसाठी या वेळी रक्तदाब, रक्तशर्करा, ई.सी.जी. आदी प्राथमिक तपासण्या तसेच औषधे व वैद्यकीय सल्ल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली

होती. या वेळी अनेक लोकप्रतिनिधींनी शिबिराचा लाभ घेतला. या वेळी ‘माधवबाग’चे संचालक डॉ. रोहित साने व डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.

‘जागतिक आरोग्य संघटने’ने केलेल्या भाकितानुसार येत्या काही वर्षांत भारतात हृदयरोगाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे या बाबतीत विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेण्याची आवश्यकता जाणवल्याने ‘माधवबाग’ या आयुर्वेदिक पद्धतींद्वारे उपचार करण्ांाऱ्या इस्पितळाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात खेडय़ापाडय़ातील सामान्य नागरिकांपासून ते कॉर्पोरेट कंपन्यांतील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वासाठी आरोग्यविषयक व्याख्याने, कार्यशाळा, तपासणी शिबिरे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘आरोग्यं हृदय संपदा’ या विशेष मोहिमेच्या माध्यमातून वर्षभरात एक लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य स्ट्रेस ई.सी.जी. तपासण्या केल्या जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health inspection for the legislative council member