मुंबई: करोनासाह वेगवेगळे साथरोग आजार, महामार्गांवरील वाढते अपघात तसेच राज्य व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसह आरोग्य विभागाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मोठ्या दुर्घटना वा विशिष्ट भागात अचानक पसरणारी साथरोग आदी लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांचा समन्वय तसेच आवश्यक त्या ठिकाणी वेगाने आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी आरोग्य विभागाची ‘वॉर रूम’ सुरू करण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले. मात्र तब्बल चार महिने उलटले असून अद्याप वॉर रूमची संकल्पना कागदावरच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोग्य विभागांतर्गत देण्यात येणारी रुग्ण सेवा व मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्याची संकल्पना आरोग्यंमत्र्यांनी एक सप्टेंबर रोजी मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या बैठकीत मांडली. तसेच याची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, सहसंचालक (तांत्रिक) डॉ. विजय बावीस्कर, सहसचिव विजय लहाने आदी उपस्थित होते. आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रुग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा… कागदपत्र जमा करणाऱ्या गिरणी कामगारांची संख्या लाखापार; आतापर्यंत ८० हजार कामगार पात्र

आरोग्य विभागाअंतर्गत आजघडीला ५०९ रुग्णालये, १०,७४८ उपकेंद्रे, १९०८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, आयुर्वेदिक, अ‍ॅलोपथी, युनानी दवाखाने तसेच शहरी भागातील दवाखाने व फिरती आरोग्य पथके आदी ८५१ आरोग्य संस्था तसेच नाशिक व अमरावती येथे संदर्भ सेवा रुग्णालये असून रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केद्र व उपकेंद्रांमध्ये मिळून एकूण ५८ हजार खाटा आहेत. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मिळून २०२२-२३ मध्ये जवळपास तीन कोटी रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात येतात. तर २४ लाख ९१ हजार ७७ रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले. एकूण चार लाख ९२ हजार छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून १२ लाख ८६ हजार रुग्णांची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. याशिवाय दोन कोटी ३३ लाख ९४ हजार २१४ विविध प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे आठ लाख बाळंतपणे होत असतात. या नियमित कामादरम्यान अनेकदा महामार्गांवर मोठे अपघात होत असतात तसेच काही भागात वेगेवेगळ्या साथी पसरतात, अशा वेळी आरोग्य यंत्रणा सतर्क असणे व तात्काळ समन्वय साधून मदतीसाठी यंत्रणा उपलब्ध होणे आवश्यक असल्यामुळे आरोग्य विभागाची ‘वॉर रुम’ ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा

मात्र त्याचवेळी आरोग्य विभागाला आज पाच महिने झाले तरी आरोग्य संचालक नाही, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांनी अनेक पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य यंत्रणेत डॉक्टर-परिचारिकांसह जवळपास १९,२०० पदे रिक्त असल्याकडेही काही ज्येष्ठ डॉक्टरांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर लक्ष वेधले. औषध महामंडळ अट्टहासाने तयार करण्यात आले मात्र औषध खरेदीची बोंब असल्याने त्याचा फटका उपचार करणाऱ्या डॉक्टरांना बसत असतो याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ७३३ मंजूर पदांपैकी ३५९ पदे भरण्यात आलेली नाहीत. महत्त्वाचे म्हणजे विशेषज्ञांच्या १७३४ पदांपैकी ९२६ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात विशेषज्ञ डॉक्टरांअभावी उपचार करण्यात अनेक अडचणी येतात असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

एकीकडे आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालयांचे मोठ्या प्रमाणात श्रेणीवर्धन करण्यात येत आहे. ३० खाटांच्या रुग्णालयांचे ५० खाटांमध्ये रूपांतर केले जात आहे तर ५० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केले जात आहे. मात्र यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांची पदेच भरली जात नसताना ‘वॉर रुम’ तयार करून तेथून आदेश दिले तरी त्याची अंमलजबावणी कशी करायची असा कळीचा मुद्दा काही ज्येष्ठ डॉक्टरांनी उपस्थित केला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वॉर रुम तयार करण्याचे आदेश देऊन चार महिने झाल्यानंतरही त्याची कोणतीही अंमलबजावणी का होऊ शकली नाही याबाबत आयुक्त धीरजकुमार यांना विचारले असता, लवकरच वॉर रुम तयार केली जाईल असे त्यांनी सांगितले. औषध महामंडळासह अनेक कामे सध्या प्राधान्यक्रमाने सुरू आहेत. भरती प्रक्रियेचे कामही सुरू असल्यामुळे वॉर रुमच्या कामाला थोडा उशीर झाल्याचे ते म्हणाले.