विनायक डिगे

मुंबई : महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून १७ मार्च रोजी घेण्यात येणाऱ्या अधिसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची पात्र – अपात्र यादी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली, मात्र मतदार यादीमध्ये नाव नसल्याने अनेक जण निवडणुकीसाठी अपात्र ठरण्याची वेळ आली आहे. मतदार यादीमध्ये आठ ते दहा उमेदवारांची नावे नसल्याचे समजते.

Announcement of CP Radhakrishnan Professor Recruitment by Maharashtra Public Service Commission in Universities nashik news
विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्राध्यापक भरती,नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची घोषणा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
MPSC Maharashtra  State Services Exam Date Update Nagpur
MPSC Update: ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेच्या तारखेसंदर्भात मोठी अपडेट, बैठकीमध्ये निर्णय होताच…
Mumbai University, Winter Session Exams,
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
Government Medical College doctor
भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली
Recruitment professors Pune University,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १३३ जागांवर भरती, अर्ज प्रक्रिया कधीपासून?
State Government decision to start virtual labs in agricultural colleges under agricultural universities Mumbai news
कृषी महाविद्यालयामध्ये आभासी प्रयोगशाळा उभारणार
supplementary exam, 12th supplementary exam results,
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर… किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण?

महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ७ फेब्रुवारी रोजी मतदार यादी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि मुंबई महानगरपालिकेशी संबंधित महाविद्यालयांमधील अनेक प्राध्यापक आणि शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत. विद्यापीठाने निवडणुकीसाठी महाविद्यालयांना ‘एलआयसी’ची यादी अद्ययावत करण्याची सूचना नोव्हेंबर २०२२ मध्ये केली होती. त्यानुसार राज्यातील सर्वच महाविद्यालयांनी त्यांच्याकडील याद्या अद्ययावत केल्या आहेत. आरोग्य विद्यापीठाने अधिसभा निवडणुकीसाठी एलआयसीच्या यादीवरून मतदार यादी जाहीर केली.

जे.जे. रुग्णालयासह अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकांचा मतदार यादीमध्ये समावेश नाही. परिणामी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील जवळपास ८०० डॉक्टरांवर निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान, मतदार यादीत नाव नसल्याने प्राध्यापक, शिक्षक आणि ‘अ‍ॅकेडमिक काऊन्सिल’ या गटातून निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या अनेक उमेदवारांवर अपात्र होण्याची वेळ आली आहे. मतदार यादीमध्ये नाव नसल्याने साधारण आठ ते दहा उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे (एमएसएमटीए) मुंबई अध्यक्ष डॉ. सचिन मुलकुटकर यांनी दिली.

 वैद्यकीय महाविद्यालयांकडून मतदार यादी जाहीर केली नसेल, तर विद्यापीठाने ती जाहीर करताना गतवर्षीची ‘एलआयसी’ यादी किंवा ‘अ‍ॅकेडमिक ऑनलाइन टीचर डेटाबेस’ या संगणकीय प्रणालीवर नोंद केलेली शिक्षकांची यादी ग्राह्य धरणे अपेक्षित होती, मात्र विद्यापीठाने तसे न केल्याने जे.जे. रुग्णालयामधील प्राध्यापक व शिक्षकांचा मतदार यादीत समावेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे जे.जे. रुग्णालयातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व परीक्षा कशी होऊ शकते, असा प्रश्न मुलकुटकर यांनी उपस्थित केला आहे.