मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विविध विद्याशाखांची टप्पा ३ मधील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा विद्यापीठाने जाहीर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्या येथील श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार असल्याने राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. मात्र विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या टप्पा ३ साठी जाहीर केलेल्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : सहा कोटींच्या कोकेनसह परदेशी नागरिकाला अटक

हेही वाचा – ४ फेब्रुवारी रोजी धारावीत जाहीर सभा, धारावीतच सरसकट ५०० चौरस फुटाच्या घरांच्या मागणीसाठी आंदोलन

या परीक्षेसाठी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सूचनेची नोंद घ्यावी. विद्यापीठाचे सर्व संलग्नित महाविद्यायातील अधिष्ठाता, प्राचार्य यांनी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health university exam will be held as per scheduled schedule mumbai print news ssb
Show comments