मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा चेंबूर परिसरात प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करणारी एक आरोग्य सेविका मंगळवारपासून बेपत्ता झाली आहे. आरोग्य केंद्रात ती सकाळी येऊन गेली. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही.घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या आरोग्य सेविकांपैकी एक असलेल्या रेखा खरटमोल या अचानक बेपत्ता झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>डाव्होसमध्ये ७६ तासांत मुख्यमंत्री फक्त ४ तास झोपले? दीपक केसरकरांच्या दाव्याची चर्चा; म्हणाले…

चेंबूर परिसरात काम करणाऱ्या रेखा या मंगळवारी सकाळी अयोध्या नगर आरोग्य केंद्रावर आल्या होत्या. त्यानंतर त्या नेमून दिलेल्या विभागात काम करण्यासाठी गेल्या. मात्र कामाचा अहवाल देण्यासाठी त्या दुपारी परत आल्याच नाहीत. तसेच त्या घरीही गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती आरोग्य सेविकांच्या संघटनेने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.