लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मुलुंड पूर्व येथील मिठागराच्या मोकळ्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून बांधकामाचा कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे सध्या या मोकळ्या जागेचे रुपांतर कचरा डेपोमध्ये झाल्यासारखे दिसत आहे. तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मुलुंडच्या केळकर महाविद्यालयालगत मिठागरची मोकळी जागा आहे. मात्र महिन्याभरापासून तेथे काही बांधकामाचा कचरा टाकण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी हे सर्व चालत असल्याने ही बाब कुणाच्या फारशा लक्षात येत नव्हती. मात्र हळूहळू कचऱ्याचे प्रमाण वाढत गेले आणि सध्या एकेकाळची मोकळी, स्वच्छ जागा कचरा डेपोप्रमाणे दिसू लागली आहे. प्रशासन मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे एक एकर परिसरात आशा प्रकारे कचरा, मातीचा भराव टाकण्यात आला असून माती टाकून ती जागा बळकावण्याचा प्रयत्न असल्याचा संशयही काही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा-मुंबई विभागाचा निकाल ९५.८३ टक्के, गतवर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ
एकीकडे मुलुंडमध्ये असलेल्या कचरा डेपोमुळे परिसरातील प्रदुषण वाढले आहे. त्यातच मिठागराच्या जागेवर आशा प्रकारे दुसरा कचरा डेपो तयार होत असल्याने तेथे धुळीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या महिन्याभरापासून मिठागराच्या जागेवर अतिक्रमण होत असताना पोलीस अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सागर देवरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नवघर पोलिसांना पत्र देऊन तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्यांनी नवघर पोलिसांना याठिकाणी मातीचा भरणा करणाऱ्या ट्रकचे नंबरही दिले आहेत. मात्र आद्यपही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.