यशस्वी हृदयरोपण झालेल्यांचा दमदार संकल्प
ऑगस्ट २०१५ मध्ये बदलापूरमधील २१ वर्षांच्या अन्वर खानवर हृदयरोपणाची पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा, पुढील १६ महिन्यांत ३२ जणांना अशाच प्रकारे नवीन हृदय मिळेल, असा विचार कुणीही केला नसेल; परंतु हृदयदानाबाबतची जनजागृती आणि चळवळींमुळे अन्वरप्रमाणेच ६० वर्षीय राजन देसाई, १६ वर्षांची स्वेडन डिसोझा, ५१ वर्षांच्या निर्मला शेलार यांच्यासह ३२ जणांना जीवनदान मिळाले, गेल्या वर्षांत हृदयप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होऊन जीवनदान मिळालेल्या या काही जणांशी संपर्क साधून ‘लोकसत्ता-मुंबई’ने त्यांच्या नव्या वर्षांतील आशाआकांक्षा जाणून घेतल्या. यापैकी ६० वर्षांच्या राजन देसाई यांना यंदाच्या मॅरेथॉनमध्ये धावायचे आहे. त्यासाठी त्यांचा सध्या जोरदार सराव सुरू आहे, तर ५१ वर्षांच्या निर्मला यांना नव्या वर्षांत विमानात बसण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे आहे.
सात पटीने वाढ
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पहिले हृदयप्रत्यारोपण करण्यात आले. यामुळे हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांना नवा मार्ग मिळाला. गेल्या दोन वर्षांत हृदयदानाची ही चळवळ वाढली असून २०१६ मध्ये हृदयप्रत्यारोपणात सात पटीने वाढ झाली आहे. तर एकूण ३४ रुग्णांना नव्या हृदयामुळे नवजीवन अनुभवणे शक्य झाले आहे. ही चळवळ राबविण्यासाठी रुग्णालयांकडून बरेच प्रयत्न करण्यात आले. वेगवेगळ्या राज्यांनीही यात सहकार्याची भूमिका निभावली.
[jwplayer RKOETsyl]
पदवी शिक्षण पूर्ण करणार
बदलापूर येथे राहणाऱ्या अन्वर खान या २१ वर्षीय तरुणाच्या हृदयाला संसर्गजन्य आजारामुळे सूज आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांतच अन्वरच्या प्रकृतीत सुधारणा झाली.‘हृदयविकारामुळे व्यायाम करण्यास बंदी होती. मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत मी व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करू लागलो,’ असे अन्वर म्हणाला. येत्या वर्षांत मला पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे आणि इलेक्ट्रॉनिक विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, असे तो म्हणाला.
विमानात बसण्याची इच्छा पूर्ण
हृदयाच्या अनियमित ठोक्यांमुळे नाशिकमधील अनेक डॉक्टरांनी निर्मला शेलार (वय ५१) यांना वाचविणे कठीण असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी अन्वर खान याच्या मुंबईत झालेल्या पहिल्या हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेविषयी त्यांना कळले आणि निर्मला यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. २०१५ मध्ये एका मेंदुमृत व्यक्तीचे हृदय निर्मला यांना देण्यात आले. ‘ या शस्त्रक्रियेनंतर आई ठणठणीत आहे. तिची विमानात बसण्याची इच्छा होती. यंदाच्या नवीन वर्षांत आम्ही ती पूर्ण केली,’ असे निर्मला यांचा मुलगा किशोर शेलार यांनी सांगितले.
मॅरेथॉनसाठी सराव सुरू
मुंबईतील चौथे हृदयप्रत्यारोपण झालेले राजन देसाई (वय ६०) यांचे मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न आहे. २०११ मध्ये राजमाची या गडावरून उतरत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी शक्य तितक्या लवकर हृदयप्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सुमारे तीन ते चार वर्षे देसाई यांनी खूप पथ्यपाणी केले. त्यांचे फिरणे, गिर्यारोहण कायमचे बंद झाले. गेल्या वर्षभरात देसाई यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. ‘आता मला मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आहे,’ अशी इच्छा देसाई यांनी व्यक्त केली.
[jwplayer UoikLOwk]