लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आज, उद्या मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे,असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवस कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. दरम्यान,पुढील दोन ते तीन दिवस मात्र मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होऊन तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच सध्या वाऱ्यांची दिशा बदललेली आहे. पश्चिमेकडून येणारे वारे सध्या उत्तरेकडून वाहत आहेत आणि वाऱ्यांची ही दिशा पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याने मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
काय काळजी घ्यावी
- उन्हात घरातून बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा.
- थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.
- उन्हामुळे तब्येत बिघडल्यानंतर तात्काळ संबंधिताला रुग्णालयात दाखल करावे.
- उष्णतेच्या झळा बसल्यानंतर तात्काळ सावलीत बसावे.