मुंबई : सलग दोन दिवस पावसाचा जोर कायम असून गुरुवारीही सखल भागात पाणी भरले आहे. त्यामुळे बेस्टचे मार्ग बदलले आहेत. गोवंडी येथे बकरा बाजारात पाणी भरल्यामुळे बस मार्ग क्रमांक ३५७, ३७५, ३७६ हे सकाळी ८.४० वाजल्यापासून टाटानगर थांबा नंतर जिजामाता भोसले मार्गाने फ्री वे जंक्शननंतर बस मार्ग क्रमांक १९ च्या मार्गाने सम्राट अशोक नगर व पुढे नियोजित मार्गाने जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच बस मार्ग क्रमांक ८, ३८३ हे दोन्ही दिशेत शिवाजी नगर जंक्शन येथून थेट सम्राट अशोक नगर असे परावर्तित केले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पोलिसांनी कात्रक रस्ता बंद केल्यामुळे रात्रीपासून बस मार्ग ४११ च्या गाड्या वडाळा स्थानकामार्गे व बस मार्ग ६७, १६९, १७२ व १६५ बस लेडीज जहांगीर मार्ग पाच उद्यान रुईया महाविद्यालय बीए रोडवरून दोन्ही दिशेमध्ये परावर्तित करण्यात आले आहेत.