मुंबई, ठाणे, पुणे : गेले काही दिवस प्रचंड उकाडा अनुभवल्यानंतर बुधवारी संध्याकाळी मुंबई, ठाण्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.१० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणपट्ट्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 पावसामुळे कल्याण, बदलापूर शहरातील काही परिसर जलयमय झाले होते. त्यातुलनेत ठाणे शहरात फारसा पाऊस झाला नाही.

काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झाला होता.  पावसाचा सर्वाधिक परिणाम कल्याण-डोंबिवली भागात झाला. कल्याण येथील पत्रीपुल भागात नव्याने बांधकाम केलेल्या एकमजली घराचे बांधकाम कोसळले. या घटनेत दोनजण जखमी झाले.  ठाणे शहरात पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे काही ठिकाणी अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

 मोसमी पावसाने राजस्थानमधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या कमाल तापमानात बुधवारी वाढ दिसून आली. सांताक्रूझ येथे ३५.१ अंश सेल्सिअस म्हणजेच सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान ३ अंशांनी जास्त होते, तर कुलाबा येथे सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी जास्त म्हणजेच कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आद्र्रताही ८० टक्क्यांच्या वर पोहोचली होती.

Story img Loader