मुंबई : आठवड्याच्या सुरूवातीला मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी पुढील दोन-तीन दिवस पुन्हा एकदा मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणात आणि घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत मंगळवार दुपारपासून पावसाने उसंत घेतली आहे. बुधवारीही पावसाने दडी मारली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ७.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १.६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यात मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जुलैच्या सुरुवातीला मुंबईत जोरदार पाऊस झाला. कोकणातही पावसाचे प्रमाण अधिक होते. जोरदार सरी बरसल्याने धरणांमध्ये पाणीसाठा जमा होऊ शकला. सध्या पावसाला पोषक स्थिती नसल्याने कोकण वगळता इतर भागात हलक्या सरी पडत आहेत. मात्र, पुढील चार दिवस मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत सध्या पावसाने उघडीप दिल्याने दुपारी ऊन चटके देऊ लागले आहे. कोकण विभाग वगळता इतर भागात कमाल तापमानाचा पारा एक, दोन अंशानी चढा आहे.