लोकसत्ता प्रतिनिधी

Heavy Rain Alert Mumbai Maharashtra : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज सकाळपासून मुंबई आणि परिसरात दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत ढगाळ वातावरणसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, रविवारी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

rain Mumbai , Mumbai rain news, Mumbai latest news,
मुंबईत पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Chance of rain in most parts of the Maharashtra state including Mumbai print news
मुंबईत पुढील तीन दिवस पावसाचे
air in Shivaji Nagar in Govandi is still bad
गोवंडीतील शिवाजी नगरमधील हवा आजही ‘वाईट’, वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण वाढले
Meteorological department predicted rain in Mumbai
मुंबईत रविवारी हलक्या सरींचा अंदाज
Heavy rain Mumbai, rain Mumbai, rain mumbai news,
मुंबईत पावसाने जोर धरला, पहाटेपासून अनेक भागांत संततधार
mumbai rain update marathi (1)
Mumbai Rain Today: आज मुंबईत पावसाची काय स्थिती? लोकल ट्रेन वेळेवर आहेत का? वाचा सविस्तर माहिती!
Mumbai Rains woman drowns in open drain
Mumbai Rains : अंधेरीत उघड्या नाल्यात पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

मागील काही दिवस मुंबईत अधूनमधून हलक्या सरी हजेरी लावत होत्या. दिवसभर मळभ आणि तुरळक ठिकाणी पावसाची रिपरिप असे वातावरण होते. दरम्यान, आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांत पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुलुंड, कांजूरमार्ग आणि पवई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

आणखी वाचा-सत्ताधाऱ्यांच्या ११ साखर कारखान्यांना मदत

मुंबई बरोबरच ठाणे परिसरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत कुलाबा येथे (३७.८ मिमी), सांताक्रूझ (४७.१ मिमी), दहिसर (३२ मिमी), राममंदिर (५०.५ मिमी), विक्रोळी (५८.५ मिमी), चेंबूर (३२ मिमी), शीव(७८ मिमी), माटुंगा (५७ मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, सायंकाळनंतर मुंबईतील पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. तर, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे तसेच पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे‌ आणि दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.