लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई तसेच उपनगरांत कालपासूनच संततधार आहे. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

शहरातील दादर, वरळी, लालबाग, भायखळा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. उपनगरातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान , आज मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून अधून मधून ६०-७० किमी ताशी अशा वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-Worli Murder : आधी मद्यपान केले, मग स्पामध्ये जाऊन…, प्रेयसीसमोरच चुलबुल पांडेची निर्घृण हत्या, वरळीत हत्येचा थरार!

मुसळधार पावसामुळे तीनही मार्गावरील रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहेत. त्यामुळे आज कार्यालय गाठण्यासाठी नोकरदारवर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे.

चक्रिय वातस्थिती विरुद्ध दिशेने येणारे वारे त्याचवेळी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात सक्रीय मोसमी वारे याचा एकत्रित परिणाम म्हणून पावसाचे प्रमाण वाढले आहे.

आणखी वाचा-विरोधकांच्या साखर कारखान्यांची कर्जकोंडी; लोकसभा निकालानंतर राज्य सरकारचा कडू डोस

आजचा पावसाचा अंदाज

मुसळधार ते अतिमुसळधार : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी,पुणे, कोल्हापूर, सातारा

मुसळधार : मुंबई , सिंधुदुर्ग , नाशिक, जालना, परभणी, नांदेड

वादळी वाऱ्यासह पाऊस : गडचिरोली, गोंदिया , नागपूर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain forecast in mumbai wind speed will also increase mumbai print news mrj