मुंबई: गेल्या दोन – तीन दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र ,मुंबईत शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर धरला.मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबई, ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील बहुतांश सर्व भागात पाऊस पडत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार – पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि इतर काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पिवळा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. यासोबतच कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीमध्येही शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा >>>महाराष्ट्र भूषण’ सोहळय़ातील दुर्घटना: चौकशी समितीस महिनाभर मुदतवाढ
हेही वाचा >>>कौटुंबिक अत्याचाराचे कलम दंडात्मक शिक्षेचे करण्यास न्यायालयाचा नकार; केंद्र सरकारच्या भूमिकेनंतर स्पष्टीकरण
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर वाढत आहे.