मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पावसाने मुक्काम ठोकला आहे. मुंबई, तसेच उपनगरांत बुधवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी घरातूनच कार्यालयीन काम करणे पसंत केले, तर कार्यलयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी काहीजण घरातून लवकर बाहेर पडल्याचे दिसत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई शहर, उपनगरात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी १.२३ वाजता भरतीची वेळ असून लाटांची उंची ४.२५ मीटर असणार आहे. यादरम्यान पाऊस असाच कोसळत राहिल्यास मुंबईत पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी पनवेल – बेलापूर रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत

हेही वाचा – मुंबई लोकल ट्रेनमध्ये महत्त्वपूर्ण बदल! यापुढे ‘हा’ डबा ज्येष्ठ प्रवाशांसाठी असणार राखीव

मुसळधार पाऊस कोसळताना अथवा भरतीच्या वेळी उंच लाटा उसळताना समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन यंत्रणांकडून करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ९८.४ मिलीमीटर, तर सांताक्रूझ केंद्रात ५२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.