मुंबईच्या दिशेने येणाऱया सर्व एक्स्प्रेस गाड्या रेल्वेट्रॅकवर पाणी साचल्याने मध्येच थांबविण्यात आल्या आहेत. * खोळंबलेल्या गाड्या- मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मध्येच खोळंबली आहे.- नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस- डेक्कनक्वीन, प्रगती एक्स्प्रेस- सिंहगड एक्स्प्रेसही मध्येच खोळंबल्याने, दोन तास उशीराने पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्याकडे जाणाऱया एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या पावसाने आज शनिवार जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने पुण्याकडे जाणाऱया सर्व एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या आहेत. पुणे-लोणावळा लोकल गेल्या तासाभरापासून आकुर्डी चिंचवड दरम्यान मध्येच खोळंबली आहे.