नैर्ऋत्य मान्सूनचे पुढे सरकणे सुरूच असून, आज रविवार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी पाणी साचले असून, मध्यरेल्वेची सेवा अर्धा ते पाऊण तास ऊशीराने सुरू आहे. लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्यरेल्वेच्या ठाणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी झाली आहे, तर कुठे पहिला पावसाळी रविवार अनुभवण्यासाठी मुंबईकर समुद्रकिनारी गर्दी करत आहेत. अंधेरी येथील चकाला परिसरात गुढघ्याभर पाणी साचेल असून, इतर उपनगर भागांतही पाणी साचल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तास अशीच पावसाची संततधार सुरू राहणार आहे. पावसाने दाखवलेल्या त्याच्या या केवळ ‘ट्रेलर’ने पालिकेची निकृष्ट दर्जाची कामे उघड पडली आहेत.