नवी मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरात पुढील काही तास मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ऐन कामावरून घरी जाण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने मुंबईत चाकरमान्यांची तारांबळ होताना दिसत आहे.
मुंबई आणि परिसरातील पावसाचा थेट फटका वाहतूक व्यवस्थेला बसतो. रस्त्यांवर पाणी साठणे, रेल्वे रुळांवर पाणी साठणे यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सायंकाळी कार्यालयातून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागताना दिसत आहे.
हवामान खात्याने म्हटलं आहे की, येत्या पाच दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या.
हेही वाचा : पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत
दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान केलं आहे. साठवलेल्या कांद्यांपैकी जवळपास ४० टक्के कांदे सडले आहेत. शेतातील इतर पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.