मुंबई : मुंबईत मध्यरात्री सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पहाटे ६:३० नंतर विश्रांती घेतली होती. तर, काही भागात हलक्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, आता पुन्हा दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई तसेच उपनगरांत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, कुलाबा आणि भायखळा परिसरात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे.तर उपनगरातील अंधेरी, वांद्रे परिसरात  पावसाने विश्रांती घेतली आहे.तसेच दादर,परळ परिसरात देखील पाऊस नाही. मुंबई बरोबरच नवी मुंबई परिसरात देखील पावसाने रविवारपासून जोरदार हजेरी लावली आहे. पनवेल, खारघर, कामोठे आणि तळोजा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता.या भागात दुपारी १ वाजल्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

हेही वाचा >>>“एकाच वेळी मुसळधार पाऊस अन्…”, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहर तुंबण्याचं कारण; स्थितीवर मात कशी करणार? म्हणाले…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तास मुंबईत अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.संध्याकाळी आणि रात्री मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.