लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Heavy Rain Alert Mumbai : मुंबई तसेच उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सखल भाग जलमय झाल्याने वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुढील तीन – चार तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची, तसेच मुंबई, उपनगरांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी परिसरात पावसाचा जोर कायम आहे. दादर,परळ, कुलाबा परिसरातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अधूनमधून ६०-७० ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
आणखी वाचा-मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेगही वाढणार
मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागातही पावसाचा जोर कायम असेल. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ६२.५ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे विक्रोळी रेल्वे स्थानकातील रुळावर पाणी साचले आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, चक्रिय वातस्थिती, विरुद्ध दिशेने येणारे वारे, तसेच मोसमी वारे उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रावर सक्रिय आहेत. याचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस कोसळत आहे.
बुधवारी सकाळी ८:३० ते गुरुवारी सकाळी ८:३० पर्यंत मुंबईत झालेला पाऊस
मुलुंड – २२४.२ मिमी
दिंडोशी- १८४.२ मिमी
वर्सोवा – १४८ मिमी