लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई तसेच उपनगरांत मंगळवारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून बुधवारी पहाटेपासून अनेक भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तविली आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
finger in ice cream
मुंबईत आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचं? महत्त्वाची माहिती आली समोर
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

मुंबईसह उपनगरांत मंगळवारपासून पावसाने हजेरी लावली आहे‌. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मोसमी पाऊस यंदा लवकर दाखल झाला असला तरी पावसात खंड पडल्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबई तसेच उपनगरांत मंगळवारी रात्री पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी पहाटेपासून दादर,भायखळा,परेल, प्रभादेवी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच उपनगरांतील गोरेगाव,अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रूझ परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील काही तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवार सकाळी ८:३० ते बुधवारी सकाळी ८:३० दरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५५.२ मिलिमीटर तर सांताक्रूझ केंद्रात २०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आणखी वाचा-सात सराफांचे पावणेचार कोटींचे दागिने घेऊन कारागिर पसार

मोसमी पाऊस दाखल झालेल्या भागात अजूनही पावसाने तितकासा जोर धरलेला नाही. पावसात खंड पडला की उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे,रायगड, रत्नागिरी भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मोसमी वाऱ्यांनी बहुतांश भागात प्रगती केली आहे.मंगळवारी विदर्भातील चंद्रपूर आणि अमरावती भागात मोसमी वाऱ्यांनी मजल मारली. त्यानंतर मात्र मोसमी वाऱ्यांची प्रगती झालेली नाही.