पावसाच्या विलंबाने आणखी पाणीकपातीची भीती निर्माण झाली असतानाच मुंबईत धो धो पाऊस पडला. तलावक्षेत्रातही दमदार पाऊस पडला असून, मंगळवारी एका दिवसात तब्बल ३४ दिवस पुरेल एवढा जलसाठा तलावात वाढला आहे. शहराला पाच महिने पुरेल एवढे पाणी जमा झाले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच मोडकसागर तलावही भरण्याची शक्यता आहे. पावसाच्या या कृपेने मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकटही टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ापर्यंत सरासरीच्या ८० टक्के पाऊस पडला होता. यावेळी जून महिना कोरडा गेल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. तलावातील साठा एक लाख दशलक्ष लिटरहून
शहराला दररोज सुमारे ३७०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज लागते. यानुसार या वाढीव जलसाठय़ामुळे शहराची ३४ दिवसांची गरज पूर्ण होऊ शकेल.
सध्या तलावांतील पाणीसाठा पाच महिन्यांसाठी पुरेसा असून वर्षभराच्या पाणीसाठय़ासाठी साडेतेरा लाख दशलक्ष लिटरची गरज आहे.
जलसमाधान!
पावसाच्या विलंबाने आणखी पाणीकपातीची भीती निर्माण झाली असतानाच मुंबईत धो धो पाऊस पडला. तलावक्षेत्रातही दमदार पाऊस पडला असून, मंगळवारी एका दिवसात तब्बल ३४ दिवस पुरेल एवढा जलसाठा तलावात वाढला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-07-2014 at 02:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain mumbai