मुंबई: सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह इतर काही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र,गेले दोन दिवस मुंबई आणि काही भागात पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळाल्या. आज पहाटेपासून मात्र अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह संततधार आहे. दरम्यान, पुढील तीन चार तासांत मुंबई, ठाणे,पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे व नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच पुढील तीन-चार तासांत मुंबईतील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. मात्र, दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, येत्या चार-पाच दिवसांत मोसमी पाऊस सक्रीय राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : “आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली?”, कोयता हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंचा सवाल

मंगळवारी सायंकाळी ५:३० पर्यंत कुलाबा केंद्रातील पावसाची नोंद ११.० मिमी तर सांताक्रूझ केंद्रातील नोंद ३१.८ मिमी होती. दरम्यान, २८ ते ३० जूनपर्यंत रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पालघर जिल्ह्याला २८ ते २९ जूनपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain predicted by meteorological department in next 3 4 hours in mumbai and some district of state mumbai print news asj