Mumbai Heavy Rain Prediction :मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र शनिवारपासून पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणात आणि घाट माथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शहर आणि उपनगरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उसंत घेतली आहे. शुक्रवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, संपूर्ण जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. कोकणातही पावसाचे प्रमाण अधिक होते. जोरदार सरी बरसल्याने धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत पावसाने दडी मारली होती.

हेही वाचा…रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

परिणामी, मुंबईकरांना असह्य उकाड्याला सामोरे जावे लागले. दुपारी उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. कमाल तापमानाचा पारा दोन ते तीन अंशानी चढा आहे. गुरुवारी सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान असून सरासरीपेक्षा ३.३ अंशानी अधिक नोंदले गेले. याआधी १८ ऑगस्ट २०२४ रोजी ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व – मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र, तसेच उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील चार ते पाच दिवस मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा…प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींची संख्या अधिक

मुसळधार

सिंधुदुर्ग, कोल्हापूर</p>

मुसळधार ते अतिमुसळधार

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा

वादळी वाऱ्यासह पाऊस

अकोला, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain predicted for mumbai and konkan regions over the weekend mumbai print news psg