मुंबई : Mumbai Weather Forecast मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण राज्य व्यापले असून गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण, तसेच पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत मोसमी पावसाने हजेरी लावताच गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, मुंबईत मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईबरोबरच, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, रायगड ते पालघरदरम्यान मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा >>> कोनमधील २,४१७ घरांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा; म्हाडाचे मुंबई मंडळ ११ कंत्राटदारांना लवकरच कार्यादेश देणार

मात्र मुंबई आणि उपनगरांत सोमवारी संध्याकाळपर्यंत जास्त पाऊस पडला नाही. मुंबईत रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० दरम्यान कुलाबा केंद्रात ६३.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २४.६ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे शून्य मिमी तर सांताक्रूझ येथे २७ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, नवी मुंबईत सोमवारी संध्याकाळी पावसाचा जोर वाढला होता.