मुंबई: मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, नवी मुंबई शहरात सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवार – बुधवारी रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
राज्यभरात सोमवारी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला पावसाने ओढ घेतली होती. दरम्यान, रायगड जिल्ह्याला सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
हेही वाचा – मुंबई : बीकेसीतील दोन भूखंडांच्या ई – लिलावाच्या निविदेला मुदतवाढ
रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तसेच पालघर जिल्ह्यातही बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाने आता बुधवारी पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.