राज्यात मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून याचा फटका अनेक गावांना बसला आहे. अशात आता मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील २ दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात १८ आणि १९ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) गुरुवारी व्यक्त केली. गेल्या २४ तासांत रायगडमध्ये वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला असून आणि किनारपट्टी परिसात दरवर्षी पडणाऱ्या पावसापैकी १७.३३ टक्के पाऊस काही दिवसांतच पडला आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने गुरुवारी दिली.

हे ही वाचा >> दहा दिवसांतच महिन्याभराचा पाऊस

कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. रविवार, सोमवारी कडक ऊन पडल्यानंतर मंगळवारी मुंबईत हलक्या सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सकाळपासूनच मुंबईतील विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला.

पाऊसभान…

३ जून रोजी मोसमी वारे केरळात दाखल झाले. त्यानंतर मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातून द्रुतगती प्रवास करत दोनच दिवसांत महाराष्ट्रात मजल मारली. मात्र, पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकू ल वातावरणीय स्थिती नसल्याने मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केलेली नाही. सध्या सूरत, नंदूरबार, भोपाळ, बरेली, अमृतसरपर्यंतची मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीची सीमा कायम आहे.

मुंबई : शिवसेना आमदाराने कंत्राटदाराला कचऱ्यानं घातली आंघोळ

विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात मोसमी वारे पोहोचले असूनही शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावणाऱ्या मोसमी पावसाने पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात अनेक ठिकाणी समाधानकारक हजेरी लावलेली नाही. पुढील पाच दिवस कोकणात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे.