मुंबई : मुंबईत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटे जोर धरला आणि मुंबईकरांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली. परिणामी, मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे लोकल सेवा मंदावली. अनेक लोकल एका मागे एक संथगतीने धावत आहेत. विस्कळीत झालेल्या लोकल सेवेमुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास प्रचंड विलंब होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईसह ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली. अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले. नदी पुलावरून पाणी वाहू लागल्याने, रस्ते मार्ग ठप्प झाले. परिणामी, मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.

हेही वाचा…अंगणवाडी मुलांच्या पोषण आहार खर्चात आठ वर्षात वाढ नाही!

सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने, त्याचा फटका लोकलच्या वेगाला बसला. ढगाळ वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दूरचा लोकल मार्ग स्पष्ट दिसत नाही. यामुळे मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीकडे येणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल २० ते ४० मिनिटे, हार्बर मार्गावरील सीएसएमटी – बेलापूर, पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल १० ते १५ मिनिटे, तर पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत.