लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई, तसेच उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून पावसाचे धारानृत्य सुरू असून मुंबईतील ठिकठिकाणचे सखल भाग जलमय झाले आहेत. त्याचबरोबर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

मुंबई शहर आणि उपनगराला गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून काही ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. यामुळे सकाळपासून वाहतूक सेवा कोलमडली आहे. शहरातील कुलाबा, वरळी, दादर,परळ, तसेच उपनगरांतील वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी गोरेगाव परिसरात पहाटे ४ वाजल्यापासून संततधार पाऊस कोसळत आहे. तसेच लोकल विलंबाने धावत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

आणखी वाचा-मुंबई : पावसामुळे लोकल मंदावली

सध्या पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत आहेत. हे वारे ६० – ७० ताशी वेगाने वाहाणार असून बाष्प देखील असणार आहे. किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि पूर्व पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र यामुळे मुंबईत आणि काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मंदावला विमानसेवेचा वेग, एअर इंडियाने केलं ‘हे’ आवाहन

गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यात झालेला पाऊस

पनवेल – ९९.६ मिमी

उरण – १२८ मिमी

कर्जत – २३१.२ मिमी

खालापूर – १४३ मिमी

उल्हासनगर – १३६ मिमी

शहापूर – ८० मिमी

ठाणे – १६३ मिमी

मुरबाड – २२८ मिमी

भिवंडी – ११० मिमी

अंबरनाथ – ७० मिमी

कल्याण – ११४ मिमी