मुंबई : ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. विविध कारणांनी कल्याण-कसारा दरम्यानची रेल्वे वाहतूक संपूर्ण ठप्प झाली. यामुळे अनेक गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले.

शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेही मुसळधार पाऊस कायम राहिल्याने ठाणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. आटगाव-तानशेत दरम्यान भूस्खलनामुळे रेल्वे रुळावर ढिगारा वाहून आला. खडावली-टिटवाळा दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे व वाशिंद-खडावलीदरम्यान रूळ पाण्याखाली गेल्यामुळे कसारा मार्ग पूर्ण बंद झाला. परिणामी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या मनमाड, नाशिक, इगतपुरीपर्यंतच चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.मध्य रेल्वेवरील वासिंद स्थानकाजवळ ओव्हरहेड विजेचा खांब पाण्याच्या प्रभावामुळे उखडला गेला. त्यामुळे मुंबई-नाशिक मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

Story img Loader