मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, यंदा पावसाचा लंपंडाव लक्षात घेता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in