मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला असून मंगळवारी दुपारी १२.४९ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर ४.७२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. बुधवारी या महिन्यातील सर्वात मोठी भरती येणार असून या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.
चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळल्यानंतर उसळणाऱ्या सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा आणि त्याच वेळी कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे नैसर्गिक पद्धतीने पाण्याचा निचरा होत नाही. त्याउलट समुद्राच्या भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे सखलभागात पाणी साचते. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यातील भरती ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार समुद्राला ७ जुलैपर्यंत दररोज मोठी भरती येणार आहे. बुधवारी सर्वात मोठी भरती येणार असून यावेळी ४.७८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
हेही वाचा >>>मोठी बातमी! अमोल कोल्हे शरद पवारांची भेट घेत खासदारकीचा राजीनामा देणार, कारण सांगत म्हणाले…
या दिवशी येणार मोठी भरती
दिवस……………………….वेळ………………..लाटांची उंची
मंगळवार ४ जुलै ……..दुपारी १२.४९ ……. ४.७२ मीटर
बुधवार ५ जुलै …………. दुपारी १.३६ ………४.७८ मीटर
गुरुवार ६ जुलै ……….दुपारी २.२३……….४.७७ मीटर
शुक्रवार ७ जुलै ……….दुपारी ३.१०…….४.६९ मीटर
शनिवार ८ जुलै ……..दुपारी ३.५५ ………४.५२ मीटर