मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ठाणे-मुंबई मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रामुख्याने कांजुरमार्ग ते मुलंड या दरम्यानच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. मेट्रो कामासाठी जेव्हीएलआरकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर युजर्स केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करून होणाऱ्या वाहतूक कोंडीची तक्रार करतानाही दिसत आहेत. तसेच यावर उपाययोजना म्हणून जड वाहतूक जुन्या महामार्गावर वळवण्याबाबत सांगत आहेत.

एकूणच धावणाऱ्या मुंबईसमोर वाहतूक कोंडीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Story img Loader