सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनासाठी बाहेर पडलेल्यांचा वाहतूक कोंडीने हिरमोड झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी झाली असून, खालापूर टोलनाक्यावर पुण्याच्या दिशेने जाणाऱया वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी मुंबईबाहेर जाणाऱयांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ईद, ख्रिसमस आणि शनिवार-रविवार या चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी  पर्यटन आणि पिकनिकचा बेत आखला पण वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा बेत पूर्णपणे फसला आहे. लोणावळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल १५ ते २० किमी अंतरापर्यंत वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत. पंधरा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Story img Loader