दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सिध्दिविनायक ट्रस्टने मुख्यमंत्री निधीला २५ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसा ठराव सिध्दिविनायक ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाने केला असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी सांगितले. राज्यात भीषण दुष्काळ असताना सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. मुंबईतील आमदारांनीही दुष्काळ निवारणासाठी एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.