भाजपची सत्ता असलेल्या नागपूर आणि नाशिक शहरांमधील मेट्रोसाठी के ंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असली तरी मुंबई महानगर क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई मेट्रो किं वा मुंबईतील अन्य कोणत्याही पायाभूत प्रकल्पांचा अर्थसंकल्पीय भाषणात तरी उल्लख करण्यात आलेला नाही.
नागपूर आणि नाशिकसह चेन्नई, कोची, बंगळुरू या शहरांमधील मेट्रो प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींची माहिती अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात मुंबईसाठी तरतूद करण्यात आल्याचा कोणताच उल्लेख नव्हता.
मुंबईतील पायाभूत सोयीसुविधांकरिता केंद्राने मदत करावी, अशी अपेक्षा महाविकास आघाडी सरकारने के ली होती. परंतु केंद्राने महाराष्ट्राबाबत दुजाभाव केल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. नागपूर आणि नाशिकला मदत केली पण मुंबई, पुण्याकडे दर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या टीकेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इन्कार केला. अर्थसंकल्पाची सारी कागदपत्रे चाळल्यावर राज्याला करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती समजू शकेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. शहरी भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात १८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून महाराष्ट्रातील शहरांच्या वाटय़ाला किती रक्कम येते हे नंतरच समजेल.
रेल्वेच्या संदर्भातील सविस्तर आकडेवारी जाहीर झाल्यावर राज्यातील कोणत्या प्रकल्पांना किती निधी मिळाला हे स्पष्ट होईल.
महाराष्ट्रासाठी तरतुदी
* नागपूर मेट्रो टप्पा – २ – ५,९७६ कोटींची तरतूद
* नाशिक मेट्रो – २.०९२ कोटी
* भुसावळ – खरगपूर रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर
* मुंबई – दिल्ली द्रुतगती मार्गाच्या उर्वरित २६० किमीच्या मार्गासाठी ३१ मार्चपर्यंत निविदा निश्चित करणार.