मुंबई : गोरगरीब – गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नयेत यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे दुर्धर आजार आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य करण्यात येते. मागील २० महिन्यांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे तब्बल २५ हजार ८७४ नागरिकांना आर्थिक मदत करण्यात आली असून त्यामुळे रुग्णांना दुर्धर आजारातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असून मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे गोरगरीब – गरजू रुग्णांना सातत्याने मदतीचा हात दिला जात आहे. १ जुलै २०२२ ते २९ फेब्रुवारी २०२४ या २० महिन्यांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे तब्बल २५ हजार ८७४ रुग्णांना मदतीचा हात देऊन त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर या २० महिन्यांमध्ये वैद्यकीय मदतीपोटी रुग्णांना २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत २ हजार ९७६ रुग्णांना २१ कोटी ७६ लाख रुपये निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे १ जानेवारी ते ३० जून २०२३ या कालावधीत ८ हजार ६८९ रुग्णांना ७२ कोटी ११ लाख रुपये, तर १ जुलै २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या आठ महिन्यांमध्ये १४ हजार २०९ रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे आर्थिक मदत देण्यात आली. या रुग्णांना ११९ कोटी ७८ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

हेही वाचा – दादर पूर्व मोनोरेल स्थानकाच्या नामकरणाची मागणी अखेर मान्य, विठ्ठल मंदिर स्थानक म्हणून ओळखले जाणार

मदतीसाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही. ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळविता येते. यासाठी मदत क्रमांक ८६५०५६७५६७ वरून थेट आपल्या मोबाइलवर अर्ज मिळविता येतो, अशी माहिती मुख्यंमत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : संपादित जुन्या इमारतींचे मालक पुनर्विकासासाठी पुन्हा सक्रिय! म्हाडाच्या हलगर्जीचा रहिवाशांना फटका?

या आजारांसाठी मिळते मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये विविध आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रक्तशुद्धीकरण, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉक्लीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.