मुंबई : मीरा रोड येथे दहीहंडी फोडताना थर कोसळून जखमी झालेल्या सूरज कदम यांना अपंगत्व आले. त्यांना शिवसेना (उबाठा) प्रणित शिव आरोग्य सेनेने आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी सकाळी गोविंदा पथकासोबत सूरज कदम घरातून बाहेर पडले. दहीहंडी फोडताना थर कोसळले. वरच्या थरावरील गोविंदा सुरज यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अपंगत्त्व आले. सूरज यांच्या आई वडिलांचे करोनामुळे निधन झाल्याने बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र सूरजच अंथरुणाला खिळल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
हेही वाचा – मुंबई : दहिसरमध्ये जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
जखमी सूरज यांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना (उबाठा) प्रणित शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून शिवाई सेवा ट्रस्टवतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते सूरज कदम यांची बहीण संपदा कदम यांना २५ हजारांचा धनादेश देण्यात आला. तसेच भविष्यातही शिवसेना सूरज कदम यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही देसाई यांनी दिली. यावेळी प्रवीण पंडित, शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ, मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, मुंबई समन्वय सचिव ज्योती भोसले, मुंबई (पूर्व) उपनगर सहसमन्वयक प्रकाश वाणी आदी उपस्थित होते.