विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. यंदा या पुरस्कारासाठी ‘लोकसत्ता’मधून स्तंभलेखन करणारे हेमंत लागवणकर यांची निवड करण्यात आली आहे.  २५ पेक्षा जास्त विज्ञान विषयक पुस्तकांचे लेखन आणि साडेसहाशेपेक्षा जास्त विज्ञान लेख लिहून विज्ञान प्रसार केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असून रुपये एक लाख रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विज्ञान प्रसारासाठी असलेला देशातला हा सर्वोच्च पुरस्कार हेमंत लागवणकर यांना राष्ट्रीय विज्ञान
दिनाला म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये एका विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा