मुंबई: बेस्ट उपक्रमाकडून प्राचीन वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविणारी पर्यटन बस सेवा सुरू आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लक्षात घेऊन पर्यटकांसाठी सकाळीच मुंबईचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने उपक्रमाने २२ ऑक्टोबरपासून सकाळी सात वाजल्यापासून दर एक तासाने हेरिटेज पर्यटन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> आनंदाचा शिधा योजनेंतर्गत रेशन दुकानांवर धान्यच नाही; दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद

गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ६.३० वाजता आणि रात्री ८ वाजता दोन बस फेऱ्या शनिवार आणि रविवारी सोडण्यात येत होत्या. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता नरिमन पाॅईंट येथून दुपारी ३ वाजता आणि सायंकाळी पाच वाजता देखील दोन अतिरिक्त बस फेऱ्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच मध्यरात्रीपर्यंत दर तासाला ही सेवा पर्यटकांच्या सेवेत आहे. त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून २०२१ पासून शनिवार-रविवार या दिवशी सकाळी साडेनऊ आणि ११ वाजता देखील दोन अतिरिक्त बस सुरू आहेत. आता दिवाळीत सकाळी सात वाजल्यापासून दर एका तासाने पर्यटन बस सेवा सुरू करण्यात येत असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.