विनयभंगामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी विक्रमगड तालुक्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरूणास अटक केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील कावळा गावातील शासकीय आश्रमशाळेत नवव्या इयत्तेत शिकणारी हर्षला बबन गडद (१५) ही मुलगी मैत्रिणींसमवेत बुधवारी दुपारी आश्रमशाळेतून आपल्या पोटखळ गावी जात होती. त्यावेळी वाटेत पोटखळ गावातीलच प्रवीण बोरखणे (२३) या विवाहित तरूणाने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने अत्यंत निराश झालेल्या हर्षलाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवीण गोरखणे याच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा