लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दिल्लीतील एका ३० वर्षीय महिलेला ५४ कोटी रुपयांच्या हेरॉईनच्या तस्करीप्रकरणी बुधवारी अटक केली. आरोपी महिला झांबिया येथून भारतात हेरॉइन आणत होती. आरोपी महिलेला अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तीन लाख रुपये मिळणार होते. याप्रकरणी दिल्लीतील एका परदेशी महिलेचा सहभाग असून तिने या महिलेचे विमानाचे तिकीट व परदेशात राहण्याची व्यवस्था केली होती. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी परदेशी महिलेचा शोध घेत आहेत.
लालरेंग पुई असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अदिस अबाबा येथून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. तिच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात सात किलो ६०० ग्रॅम संशयीत भुकटी सापडली. तपासणीत ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा- भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत समुद्रात उतरवण्यात आले
जप्त करण्यात आलेले अमलीपदार्थ उच्च प्रतिचे असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ५४ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले त्यानंतर बुधवारी या महिलेला अटक करण्यात आली.
आरोपी महिलेच्या चौकशीत, डिसेंबर महिन्यात दिल्लीत तिची एका परदेशी महिलेसोबत ओळख झाली होती. तिने महिलेला व्यवसायाचे आमीष दाखवले. त्यानंतर ओळख वाढवून या परदेशी महिलेने झांबियातून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी प्रत्येक खेपेला तीन लाख रुपये देण्याचे आमीष दाखवले. आरोपी महिलेने तस्करीसाठी होकार दिल्यानंतर परदेशी महिलेने तिचे विमानाचे तिकीट व परदेशी व्हिसा यांची व्यवस्था केली. झांबियामध्ये गेल्यानंतर तिला एक ट्रॉली बॅग देण्यात आली. ती बॅग घेऊन विमानातून उतरताना या महिलेला डीआरआयने अटक केली. या वर्षी जानेवारीमध्ये तिने झांबियातून आदिस अबाबामार्गे मुंबईत यशस्वीपणे तस्करी केली होती. या कामासाठी तिला तीन लाखांहून अधिक रुपये मिळाले होते, असे सूत्रांनी सांगितले. डीआरआय याप्रकरणी दिल्लीतील एका परदेशी महिलेचा शोध घेत आहे.