मुंबई : उच्च कोलेस्ट्रॉल पातळीने हृदयाशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असून हे जागतिक स्तरावरील चिंतेचे कारण ठरत आहे. जोपर्यंत एखादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवत नाही तोपर्यंत उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे दिसून येत नाहीत. १९ ते २४ वयोगटातील तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वयाच्या ३५ पस्तीशीनंतर हृदयविकाराचा धोका ५० टक्के वाढू शकतो. यासाठी नियमित लिपिड प्रोफाइल स्क्रीनिंग आणि व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे ह्रदयविकार तज्ञांचे म्हणणे आहे.

कोलेस्ट्रॉल हा चरबीचा एक प्रकार असून ज्याला लिपोप्रोटीन म्हणतात. लिपोप्रोटीनचे दोन प्रकार आहे, कमी घनता लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एलडीएल) आणि उच्च घनता लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एचडीएल) आहेत. शरीरात एचडीएल चे प्रमाण वाढणे चांगले मानले जाते, तर दुसरीकडे एलडीएल चे प्रमाण वाढणे आपल्या शरीरासाठी खूप वाईट मानले जाते. एलडीएल हे आपल्या शरीरासाठी वाईट कोलेस्ट्रॉल मानले जाते. जेव्हा एलडीएल जास्त असते तेव्हा ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. प्रामुख्याने ज्यांना मधुमेह अथवा रक्तदाब आहे.तसेच जे धुम्रपान वा तंबाखू सेवन करतात अशा लोकांमध्ये ह्रदयविकाराचा धोका जास्त संभवतो असे केईएम रुग्णालयाच्या ह्रदयविकार विभागाचे प्रमुख डॉ अजय महाजन यांनी सांगितले.

Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Pan Card For Minor
Pan Card For Minor :१८ वर्ष पूर्ण होण्याआधी काढू शकता पॅन कार्ड, फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

आणखी वाचा-दादरमधील महिलेची पावणेसहा कोटींची सायबर फसवणूक,सायबर पोलिसांनी आरोपीला पुण्यातून केली अटक

भारत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या १० पैकी ७ तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक आहे. शिवाय, उच्च कोलेस्टेरॉलची समस्या ही पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही सारख्याच प्रमाणात पहायला मिळत आहे. तरुणांमध्ये उच्च कोलेस्टेरॉल पातळीचे कारण म्हणजे लठ्ठपणा, धूम्रपान, कौटुंबिक इतिहास, आनुवंशिकता, थायरॉईडची समस्या, आहाराच्या चुकीच्या सवयी, उच्च रक्तदाब, बैठी जीवनशैली आणि अल्कोहोलचे अतिसेवन यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते असे लीलावती रुग्णालयातील ह्रदयविकार डॉ विद्या सुरतकल यांनी सांगितले.

उच्च कोलेस्ट्रॉल पातळी तुमच्या हृदयावर परिणाम करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांना आमंत्रण देते. कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये प्लेक तयार झाल्याने छातीत दुखू शकते (एनजाइना). शिवाय, तुमच्या रक्तवाहिन्यांमधील फॅट जमा झाल्याने ब्लॉकेजस, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका आहे. गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्यास एखाद्याच्या अमुल्य जीव वाचविता येऊ शकतो. वेळोवेळी लिपिड प्रोफाइल चाचणी करणे, ज्याला कोलेस्टेरॉल चाचणी किंवा लिपिड पॅनेल देखील म्हणतात हे कोलेस्टेरॉलची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका किती आहे हे दर्शविण्यास मदत करतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी कोलेस्टेरॉलची पातळी 200 एमजी/डीएल पेक्षा कमी असली पाहिजे, एलडीएल १०० एमजी/ डीएल पेक्षा कमी आणि एचडीएल पुरुष आणि स्त्रियांसाठी ४० एमजी/डीएल पेक्षा जास्त असावा असे डॉ विद्या सुरतकल यांनी सांगितले.

आणखी वाचा-खासगी गृहप्रकल्पांतील ९१३ सदनिकांची म्हाडाकडून थेट विक्री

मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिकचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. संदीप बॅनर्जी म्हणाले की, उच्च कोलेस्टेरॉल पातळीमुळे १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये भविष्यात हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या हृदयविकाराच्या समस्या सर्वसामान्यांच्या तुलनेने अधिक असतो. अशावेळी नियमित कोलेस्ट्रॉल तपासणी करण्याता सल्ला दिला जातो, ज्याला लिपिड प्रोफाइल किंवा लिपिडोग्राम चाचणी देखील म्हणतात, जी कोलेस्ट्रॉलची पातळी आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी तपासण्यासाठी आणि हृदयाच्या समस्या आणि जोखमीचे घटक जाणून घेण्यासाठी केली जाते.

डॉक्टरांच्या शिफारशीनुसार दर आठ नऊ महिन्यांनी लिपिड प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे आणि पौष्टिक आहार घेणे, व्यायाम करणे आणि चांगली झोप घेणे गरजेचे असून संतुलित जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. तरुणांना त्यांचे कोलेस्ट्रॉल वेळोवेळी तपासण्याची गरज आहे.

आणखी वाचा-निवडणुकीपूर्वी गृहनिर्माण धोरण ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांची घाई

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमित गंगवानी म्हणाले की, उच्च कोलेस्ट्रॉलची पातळीची समस्या आता केवळ प्रोढांमध्येच नाही तर तरुणांमध्येही मोठ्या संख्येने दिसून येते. या प्रवृत्तीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, ज्यामुळे ह्रदयावर हानिकारक परिणाम होतात. १० पैकी ६ स्त्रिया आणि पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे दिसून येते, ज्यामुळे या व्यक्तींना भविष्यात हृदयविकाराचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक, पेरिफेरल आर्टरी डिसीज होऊ शकतो ज्यामुळे थकवा येणे आणि पाय दुखणे आणि मोठ्या हृदयाच्या झडपांचा विकार अशी लक्षणे दिसू येतात. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि अनुवांशिकता तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी लिपिड चाचणीद्वारे करणे फायदेशीर ठरू शकते. संतुलित आहाराचे सेवन करणे, दररोज व्यायाम करणे, हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे सेवन करणे गरजेचे आहे.

तृणधान्य, फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला आहार तसेच सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट, सोडियम आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. आठवड्यातून पाच दिवस किमान ४५ मिनिटे व्यायाम करा, वजन नियंत्रित राखा आणि धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन टाळा. औषधांचा डोस अर्धवट सोडू नका तसेच नियमित आरोग्य तपासणी करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी तपासा व हे लक्षात असू द्या की कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन हे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक आहे असे डॉ अजय महाजन यांनी सांंगितले.

Story img Loader