मुंबई : रस्ते अपघातानंतर अचेतन अवस्थेतील मुलीच्या वडिलांना पश्चिम रेल्वेने उच्च न्यायालयात जमा केलेली नुकसान भरपाईची १.१५ कोटी रुपये रक्कम काढण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात रस्ता ओलांडत असताना निधी जेठमलानी हिला पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियांत्रिकी, सिग्नल बांधकामाच्या वाहनाने धडक दिली होती. २८ मे २०१७ रोजी हा अपघात झाला होता. या अपघातात निधी गंभीर जखमी झाली. परंतु तेव्हापासून ती अचेतन अवस्थेत आहे.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने निधी हिला नुकसान भरपाई म्हणून ६९ लाख ९२ हजार १५६ रुपये देण्याचे आदेश दिेले होते. फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या आदेशाला पश्चिम रेल्वेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी निधी रस्ता ओलांडताना फोन बोलत होती, असा दावा पश्चिम रेल्वेने केला. तर नुकसानभरपाईचा मूळ दावा २.२२ कोटी रुपयांचा होता. तसेच दिलेल्या नुकसान भरपाईव्यतिरिक्त, रेल्वेने न्यायालयात १.५० कोटी रुपये जमा केले होते. त्यातील व्याज पीडितेच्या कुटुंबाने तिच्या उपचारांसाठी वापरले असून १.१५ कोटी न्यायालयात अद्यापही जमा असल्याचे पीडितेच्या वडिलांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

हेही वाचा : ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न? उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले, “अंधेरी पोटनिवडणुकीत…”

त्यावर अशा प्रकरणांचा सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. या प्रकरणी एका मुलीचा जीवन धोक्यात आहे, तिचे भविष्य अंधारात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी अंतरिम आदेश देणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले. प्रकरणातील वस्तूस्थितीशी संबंधित बाबींवर पुढील टप्प्यावर विचार केला जाईल, असे स्पष्ट करून निधी हिच्या वडिलांना उच्च न्यायालयात रेल्वेने जमा केलेली शिल्लक रक्कम व्याजासह काढण्याची परवानगी दिली.

Story img Loader