अग्निशमन दल जवान मृत्यूप्रकरणांत नुकसानभरपाईचा प्रश्न

आग शमविताना जखमी वा मृत्युमुखी पडणाऱ्या अग्निशमन अधिकारी-जवानांना नुकसानभरपाई देण्याच्या योजनेत २००९ सालापासून कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. शिवाय या योजनेनुसार अधिकारी-जवानांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचीही तरतूद नाही. त्यामुळे योजनेत बदल करून नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्याचे आणि अधिकारी-जवानांच्या वारसदारांना नोकरीची तरतूद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी पालिकेला दिले.

आग शमविताना जखमी वा मृत्युमुखी पडणाऱ्या अग्निशमन अधिकारी-जवानांना नुकसानभरपाई देण्याबाबत आणि त्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची योजना आहे का, असा सवाल करत तशी योजना नसल्यास ती तात्काळ आखण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

गिरगावातील ‘त्या’ दोन इमारतींच्या पाहणीचे आदेश

गिरगाव येथील व्ही. पी. रोड परिसरातील अर्थ कॅसल आणि अर्थ पिलर नावाच्या इमारतींमध्ये नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. न्यायालयाने वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्यामार्फत या इमारतींची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader